Aaditya Thackeray Press Conference
Aaditya Thackeray Lokshahi

Aaditya Thackeray: "मिंधे सरकारला आव्हान देत आहे, हिम्मत असेल तर..."; आदित्य ठाकरेंचा घणाघात

पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला.
Published by :
Naresh Shende
Published on

Aaditya Thackeray On CM Eknath Shinde: शिवसेना ठाकरे गटाकडून आम्ही मागणी केली होती की, मुंबई असो किंवा इतर ठिकाणी एसआरएचे अनेक प्रकल्प रखडले आहेत, झोपडपट्टी पुर्नवसनाचे प्रकल्प रखडले आहेत. बीडीडीची डेव्हलोपमेंट केली आहे, तशाप्रकारे ठेकेदार नेमून सरकारने विकास करावा. ही आमची पहिली मागणी होती. अनेक ठिकाणी बहुमजली झोपडपट्ट्या झालेल्या आहेत, त्यांनादेखील पात्रता यादीत घ्यावं. त्यांनादेखील ही घरं देण्यात यावी. मी मिंधे सरकारला आव्हान देत आहे, हिम्मत असेल तर आज शेवटच्या दिवशी आमची मुंबईसाठीची मागणी मान्य करा. बहुमजली एसआरए आहे, ते देखील तुम्ही मान्य करा. कारण ही मुंबईची गरज आहे. आज खोके सरकारचा शेवटचा दिवस आहे. आमचं सरकार आल्यावर आम्ही हे करूच. पण आज मी पुन्हा एकदा खोके सरकारला सांगत आहे की, बहुमजली एसआरए मुंबई तसच महाराष्ट्रातल्या अनेक शहरांमध्ये असतील, त्यांना कायदेशीर मान्यता द्या.

गोरेगाव मुलुंड-लिंक रोड २०२१ आम्ही एका बाजूचं भूमिपूजन केलं. त्यानंतर २०२२ मध्ये पूर्ण भूमिपूजन झालं. पण ते काम सुरु असताना, एका टनेलचं टेंडरिंग झालं होतं. मुंबई महानगरपालिकेनं ते काम टाळलं होतं. सरकार पाडल्यानंतर खोके सरकारने ते काम रद्द करून एका आवडत्या ठेकेदाराला ज्याच्यांशी त्याचे इलेक्ट्रॉल बॉण्ड घट्ट आहेत, अशा ठेकेदाराला त्यांनी दोन्ही टनेलचं काम दिलं.

२०२२ पासून २०२४ पर्यंत काहीही काम केलं नाही आणि आता पुन्हा एकदाभूमिपूजन करतात. प्रधानमंत्री देशाचे आहेत. त्यांना खोट्या कामासाठी आणून तुम्ही देशाचा अपमान करत आहेत. १५ जानेवारी २०२३ ला आम्ही पत्रकार परिषद घेतली होती. आम्ही ६ हजार कोटींचा रस्त्याच्या घोटाळा उघड केला होता. त्यानंतर त्यांनी १८ जानेवारीला पंतप्रधानांच्याहस्ते भूमिपूजन करुन घेतलं. तरीही एक सुद्धा रस्ता चालू झाला नाही. कोस्टल रोडही पूर्णपणे उघडलेला नाही, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com