Pan-Aadhaar Link : आधार कार्ड पॅनशी लिंक केलं? नाहीतर तुम्हाला भरावा लागणार दंड
Admin

Pan-Aadhaar Link : आधार कार्ड पॅनशी लिंक केलं? नाहीतर तुम्हाला भरावा लागणार दंड

Pan-Aadhaar Link पॅन कार्ड आधारशी लिंक करण्याची शेवटची तारीख 31 मार्च आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

Pan-Aadhaar Link पॅन कार्ड आधारशी लिंक करण्याची शेवटची तारीख 31 मार्च आहे. आधार क्रमांक पॅनशी लिंक करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2023 आहे. त्यानंतर तुम्हाला दंड भरावा लागणार आहे. 1 एप्रिलपासून पॅन कार्ड आणि आधार कार्ड हे लिंक असणे अनिवार्य करण्यात आलं आहे.

आर्थिक कामांसाठी पॅनकार्ड हे अतिशय महत्त्वाचं आहे. जर पॅन आधारशी लिंक नसेल तर आयकर रिटर्न मिळणार नाही. तसेच तुम्ही पॅन कार्ड वापरू शकणार नाही. तसेच ते दुसरे पॅन कार्डसुद्धा बनवू शकणार नाही. 31 मार्च नंतर आधार-पॅन लिंक करण्यासाठी 1000 रुपयांचा दंड भरावा लागेल. आयकर विभागाच्या incometaxindiaefiling.gov.in या वेबसाईटवर ई-फायलिंग ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. ज्यावर तुम्ही हे लिंक करु शकता.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com