पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर खड्ड्याने घेतला एका तरुणाचा बळी

पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर खड्ड्याने घेतला एका तरुणाचा बळी

तरुण दिवाळी सणाला निघाला आणि मध्येच अपघात झाला
Published by :
shweta walge
Published on

आदेश वाकळे, संगमनेर : संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील बोटा शिवारात असणाऱ्या ऐका खड्ड्याने २६ वर्षीय तरुणाचा बळी घेतल्याची घटना घडली आहे. पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर सर्वत्र खड्ड्यांची साम्राज्य निर्माण झाले आहे. एैन दिवाळीत ही घटना घडल्याने संगमनेरच्या आमलेवाडी गावावर शोककळा पसरली आहे.

दिवाळी सणानिमित्ताने पुण्यावरून संगमनेरच्या सावर गाव घुले गावाजवळ असलेल्या आमलेवाडी आपल्या गावी चाललेला २६ वर्षीय युवक सागर भाऊसाहेबआमले हा बोटा गावाजवळील ओम साई ड्राइव्हर ढाब्याजवळ आला असता महामार्गावर पडलेल्या खड्ड्यात दुचाकी घसरली त्यात हा युवक गाडीवरून पडला. त्यात पाठीमागून येणाऱ्या अज्ञात वाहनाखाली सापडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.घटनेने बोटा परिसरात खळबळ माजली आहे. या घटनेची माहिती समजताच पोलिस हेड कॉन्स्टेबल कैलास देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी खासगी रुगणवाहीकेतून संगमनेर येथील कुटीर रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

नाशिक पुणे हा महामार्ग अजून किती जणांचे बळी घेणार आहे. यावर कुणाचे नियंत्रण आहे की नाही. महामार्गावरील खड्डे अपूर्ण कामे याबाबत अनेकदा आंदोलने झाली. आवाज उठवले गेले परंतु गाढ झोपेचे सोंग घेतलेल्या महामार्ग प्रशासनास कोण जागे करणार असे अनेक प्रश्न आता पठार भागातील नागरिकांच्या मनात उपस्थित होत आहे.

पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर खड्ड्याने घेतला एका तरुणाचा बळी
दर्शनासाठी आला अन् दानपेटीतील रक्कम घेऊन पळाला
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com