Grant Road Building Collapsed: ग्रँट रोडच्या नाना चौकातील इमारतीचा भाग कोसळून एका महिलेचा मृत्यू
ग्रँट रोडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. पावसामुळे मुंबईत इमारतीचा भाग कोसळला. ग्रँट रोडच्या नाना चौकातील इमारतीचा भाग कोसळला. अग्निशमनदलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. ग्रँट रोड दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती आहे तर तिघांवर उपचार सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.
रुबिनिसा मंजिल इमारतीत ही दुर्घटना घडली आहे. इमारतीचा बाल्कनी व स्लॅब कोसळल्याने दुर्घटना घडली. अध्यापही आणखीन 7 ते 8 लोक काही लोक फसले असल्याची माहिती मिळत आहे. घटनास्थळी महानगरपालिका अधिकारी आणि अग्निशमन दलाचे अधिकारी दाखल झाले असून इमारतीत फसलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.
इमारतीला म्हाडाने नोटीस बजावली होती. 7-8 लोक इमारतीच्या चौथ्या मजल्यावर अडकले आहेत. इमारतीत अडकलेल्या रहिवाशांना सुखरूप बाहेर काढण्याचे प्रयत्न सूरू आहेत. इमारतीत 40 जण अडकले होते. त्यातील काहींना बाहेर काढलं आहे. तर इतरांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. या इमारतीचा आणखी काही भाग कोसळण्याची शक्यता आहे.