Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर दोन तासांचा ब्लॉक; वाहतुकीसाठी पर्याय कोणता?
पुणे | मुंबई द्रुगतीमार्गावर पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर (10 ऑक्टोबर) दुपारी बारा ते दोन दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. अशी माहिती महामार्ग पोलिसांनी दिलेली आहे. किलोमीटर ४५ आणि ४५/ ८०० या ठिकाणी Gantry उभारण्यात येणार आहे. Gantry बसविताना सदर कालावधीत पुणे वाहिनीवरील सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. द्रुतगती मार्गावरील अपघात रोखण्यासाठी आणि वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आयटीएमएस प्रणाली कार्यान्वित केली जात आहे.
यासाठी हा दोन तासाचा ब्लॉग घेतला जाणार आहे. तरी मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या वाहन चालकांनी याची नोंद घ्यावी तसेच पर्यायी मार्गाचा वापर करावा अस आवाहन महामार्ग पोलिसांनी केल आहे. आज (10 ऑक्टोबर) दुपारी 12 ते 2 दरम्यान पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरुन हलक्या वाहनांसाठी शिंग्रोबा घाटातील वाहतूक सुरु राहणार आहे.