Monkeypox : मंकीपॉक्सचा धोका वाढला; भारतात मंकीपॉक्सचा तिसरा रुग्ण आढळला

Monkeypox : मंकीपॉक्सचा धोका वाढला; भारतात मंकीपॉक्सचा तिसरा रुग्ण आढळला

मंकीपॉक्स झपाट्याने पसरत असल्याचे पाहायला मिळत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

मंकीपॉक्स झपाट्याने पसरत असल्याचे पाहायला मिळत आहे. मंकीपॉक्सचा संसर्ग वाढत चालला आहे. भारतात मंकीपॉक्सचा तिसरा रुग्ण आढळला असल्याची माहिती मिळत आहे.

केरळमध्ये UAE तून परतलेल्या तरुणाला मंकीपॉक्सची लागण झाली आहे. तरुणावर कोची येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

याच पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून मंकीपॉक्सचा प्रसार टाळण्यासाठी देशात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. यासोबतच प्रतिबंधात्मक उपायांबाबत जागरुकतेसाठी उपक्रम राबवण्याच्या सूचना देण्यात आल्या असून आरोग्य सचिव अपूर्व चंद्रा यांनी देशात हायअलर्ट जारी केला असल्याची माहिती मिळत आहे.

सर्व राज्यांना मंकीपॉक्सबाबत उपायोजना करण्याचे आदेश देण्यात आले असून काळजी घेण्याचं आवाहन देखील करण्यात आले आहे. तसेच उपाययोजनांबाबत अहवाल सादर करण्याचे आरोग्य विभागाने आदेश दिले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com