उत्तरप्रदेशमध्ये सत्संग सोहळ्यात चेंगराचेंगरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोस्ट शेअर करत म्हणाले...

उत्तरप्रदेशमध्ये सत्संग सोहळ्यात चेंगराचेंगरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोस्ट शेअर करत म्हणाले...

उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. रतिभानपूर येथे सत्संगादरम्यान चेंगराचेंगरी झाली आहे.
Published by :
Dhanshree Shintre

उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. रतिभानपूर येथे सत्संगादरम्यान चेंगराचेंगरी झाली आहे. या सत्संगादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत 100 पेक्षा जास्त भाविकांचा मृत्यू झाला आहे आणि अनेक लोक जखमी झाले आहेत. त्यापैकी बहुतांश महिला आणि लहान मुले आहेत. सर्व जखमींना उपचारासाठी एटा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

एकनाथ शिंदे पोस्ट शेअर करत म्हणाले की, उत्तर प्रदेश राज्यातील #हाथरस येथे आयोजित करण्यात आलेल्या धार्मिक कार्यक्रमात घडलेली चेंगराचेंगरीची घटना अत्यंत दुर्दैवी आणि दुःखद आहे. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या सर्वांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या सर्वांच्या कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो...

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, उत्तर प्रदेशातील हाथरस येथे झालेल्या भीषण अपघाताबाबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी यांच्याशी बोललो. यूपी सरकार सर्व पीडितांना शक्य ती सर्व मदत करण्यात गुंतले आहे. यामध्ये ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्यासोबत माझी सहानुभूती आहे. यासोबतच सर्व जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी मी कामना करतो.

सत्संग संपला. लोक एकत्र निघून जात होते. हॉल छोटा होता. गेटही पातळ होते. आधी बाहेर पडण्यासाठी चेंगराचेंगरी झाली. लोक एकमेकांवर तुटून पडले. बहुतेक महिला आणि मुले होती. त्यामुळे दीडशेहून अधिक जण जखमी झाले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com