Plane Collapsed : इंदापूरमध्ये मक्याच्या शेतात कोसळलं विमान; प्रशिक्षण घेत होती पायलट तरुणी

Plane Collapsed : इंदापूरमध्ये मक्याच्या शेतात कोसळलं विमान; प्रशिक्षण घेत होती पायलट तरुणी

पुणे (Pune) जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. इंदापूरमध्ये शिकाऊ विमान (Plane) कडबनवाडी येथे कोसळलं आहे.
Published by :
Shweta Chavan-Zagade
Published on

अमोल धर्माधिकारी | पुणे : पुणे (Pune) जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. इंदापूरमध्ये शिकाऊ विमान (Plane) कडबनवाडी येथे कोसळलं आहे. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही. पायलट भावना राठोड असे युवतीचे नाव असून किरकोळ जखमी झाल्या आहेत. (Pune Indapur Todays News)

Plane Collapsed : इंदापूरमध्ये मक्याच्या शेतात कोसळलं विमान; प्रशिक्षण घेत होती पायलट तरुणी
Dhairyasheel Mane : कोल्हापुरात शिवसेना विरुद्ध शिंदे गट संघर्ष पेटणार? खासदार धैर्यशील मानेंच्या घरावर शिवसैनिकांचा मोर्चा

मिळालेल्या माहितीनुसार, प्रशिक्षणासाठी वापरले जाणाऱ्या ग्लायडर विमानाने बारामतीहून उड्डाण भरलं होतं. कसरत करत असताना हे विमान अचानक इंदापूर तालुक्यातील कडबनवाडी येथे एका मक्क्याच्या शेतात कोसळले. तांत्रिक बिघाड झाल्याने हे विमान कोसळले असल्याची प्राथामिक माहिती समोर आली आहे. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नसून प्रशिक्षणार्थी वैमानिक भावना राठोड किरकोळ जखमी झाली आहे. दरम्यान, विमान कोसळल्याची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. (Pune Latest News)

Plane Collapsed : इंदापूरमध्ये मक्याच्या शेतात कोसळलं विमान; प्रशिक्षण घेत होती पायलट तरुणी
इच्छा तेथे मार्ग! नुकसान टाळण्यासाठी भर पावसात शेतकऱ्याने केली काकडीची तोडणी

जखमी झालेल्या या वैमानिक भावना राठोडला प्राथामिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ग्लायडर विमान चालवताना प्रशिक्षित चालक आणि प्रशिक्षणार्थी असे दोघे विमानात असणे आवश्यक आहे. मात्र, या घटनेत एकटी प्रशिक्षणार्थी तरुणी कशी? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com