Chandipura Vesiculovirus: गुजरातमध्ये कोरोना व्हायरसनंतर आला आता 'चांदीपुरा' नावाचा नवा व्हायरस

Chandipura Vesiculovirus: गुजरातमध्ये कोरोना व्हायरसनंतर आला आता 'चांदीपुरा' नावाचा नवा व्हायरस

कोरोना व्हायरसनंतर आता गुजरातमध्ये 'चांदीपुरा' नावाचा व्हायरस पसरला आहे.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

कोरोना व्हायरसनंतर आता गुजरातमध्ये 'चांदीपुरा' नावाचा व्हायरस पसरला आहे. या व्हायरसमुळे 2 दिवसांत 4 मुलांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. साबरकांठा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये या मुलांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुलांचे सँपल पुण्याला तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्याचबरोबर या व्हायरसमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले पाहायला मिळाले.

याची लागण झालेल्या आणखी 2 मुलांवर अजूनही उपचार सुरू आहेत. मुलांच्या मृत्यूनंतर आरोग्य विभागही सक्रिय झाला आहे. साबरकांठा आणि अरावली जिल्ह्यात नवीन व्हायरसबाबत सर्वेक्षण सुरू करण्यात आलं आहे. चांदीपुरा' व्हायरसची लागण झालेल्या मुलांमध्ये मेंदूला सूज येणं आणि इतर अनेक लक्षणं दिसू लागतात.

हिंमतनगर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एकूण 6 रुग्ण दाखल होते. साबरकांठा येथील खेडब्रह्मा येथील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर अरावली जिल्ह्यातील भिलोरा येथील दोघांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत पाच जणांचे सँपल पुण्यातील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. अजून एक सँपल पाठवायचं आहे. सँपलचा रिपोर्ट सोमवारी म्हणजेच 15 जुलै रोजी येतील.

Chandipura Vesiculovirus: गुजरातमध्ये कोरोना व्हायरसनंतर आला आता 'चांदीपुरा' नावाचा नवा व्हायरस
लोकमान्य टिळक गोरखपूर एक्सप्रेसला ब्रेक बाइंडिंगला लागली आग
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com