राज्याच्या पर्यटन विभागाचा नवा उपक्रम; ज्येष्ठ नागरिकांसाठी गणपती दर्शन यात्रा
कोरोनाच्या दोन वर्षानंतर गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. मोठ मोठ्या गणपतींचे आगमन अगदी थाटामाटात होत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याच्या पर्यटन विभागाचा नवा उपक्रम समोर येत आहे. राज्याच्या पर्यटन विभाग आणि स्थानिक महापालिकेने संयुक्तपणे 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी गणपती दर्शन यात्रेचे आयोजन केलंय. 1, 2, 5, 6 आणि 7 सप्टेंबर या पाच दिवशी यात्रा आयोजित करण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी नागरिकांनी पर्यटन महासंचालनालयाच्या खालील अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
मुंबई : सुहास 7738694117 / अजिंक्य 8779898001
ठाणे : प्रशांत 9029581601 / कल्याणी 7030780802
पुणे : अजय 7887399217 / पुजारी 8888363647
नागपूर : पंकज 9665852021 / रजनी 9764481913
ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या शहरांतील प्रसिद्ध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे व गणेश मंदिरांची यात्रा घडविली जाणार आहे. यासाठी बृहन्मुंबई, ठाणे, पुणे व नागपूर महानगरपालिकेकडून वातानुकूलित बसेस, आरोग्यसेवक, गाईड आणि नाश्ता या सुविधा दिल्या जाणार आहेत. तसेच सर्व मंडळे आणि मंदिरात गणपती दर्शनासाठी थेट प्रवेश दिला जाईल.