अमरावतीच्या नागपुरी गेट पोलीस स्टेशनवर जमावाकडून दगडफेक

अमरावतीच्या नागपुरी गेट पोलीस स्टेशनवर जमावाकडून दगडफेक

अमरावतीच्या नागपुरी गेट पोलीस स्टेशनवर जमावाकडून दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

सूरज दहाट, अमरावती

अमरावतीच्या नागपुरी गेट पोलीस स्टेशनवर जमावाकडून दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली आहे. दगडफेकीत 27 पोलीस जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला.

संतप्त जमावाकडून तुफान दगडफेक करण्यात आली पोलीस स्टेशनची नासधूस, पोलिसांच्या वाहनांवरही दगडफेक, पोलीस व्हॅनसह दुचाकी देखील फोडण्यात आल्या. नागपुरी गेट पोलीस स्टेशनच्या हद्दीत कलम 144 लागू करण्यात आले आहे.

उत्तर प्रदेशातील गाझियाबाद मधील यती नरसिंह आनंद यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी पोलिसांकडून FIR लिहिण्यास उशीर झाल्याने जमाव आक्रमक झाल्याची माहिती मिळत आहे.

याच पार्श्वभूमीवर सध्या नागपुरी गेट पोलीस स्टेशन परिसरात तणावपूर्ण शांतता असून अमरावती शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच अफवांवर विश्वास ठेवू नका शांतता राखा, असे पोलीस आयुक्तांकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com