Crime
CrimeMurder

धक्कादायक! ऑनलाईन गेम खेळण्यास नकार; अल्पवयीन मुलाने केला आईचा खून

Crime : हत्येच्या बातमीने परिसरात खळबळ
Published on

लखनऊ : उत्तरप्रदेशच्या लखनऊमधून एक 16 वर्षीय मुलाने आपल्याच आईची हत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे. केवळ ऑनलाईन गेम खेळण्यासाठी नकार देत असल्याने व अभ्यास करण्यासाठी सांगत असल्याने अल्पवयीन मुलाने आईचा खून केल्याचे समजत आहे. साधना असे मृतकाचे नाव आहे. या बातमीने परिसरात एकच खळबळ माजली आहे.

लखनऊमधील वृंदावन कॉलनीमध्ये 16 वर्षीय आरोपी, त्याची आई व 10 वर्षीय बहिण राहत असून त्याचे वडील सैन्यात कार्यरत आहेत. 7 जून रोजी आरोपीने आपल्याच वडीलांच्या लायन्सस बंदूकीने आरोपीने आईची हत्या केली. या बंदूकीच्या आवाजाने बहिणीला जाग आल्याने आरोपीने धमकी तिलाही दिली.

धक्कादायक म्हणजे दुसऱ्या दिवशी उठून आरोपीने बहिणीला एका रुममध्ये कोंडले व मित्रांबरोबर बाहेर फिरण्यास गेला. तसेच, दिवस-रात्र लॅपटॉपवर चित्रपट पाहिले. साधना दोन-तीन दिवस न दिसल्याने शेजारच्यांनी आरोपीकडे विचारपूस केली असता आजी आजारी असल्या कारणाने माहेरी गेल्याचे सांगितले.

परंतु, साधनाचा मृतदेह दोन-तीन दिवसांपासून रूममध्येच असल्याने तो सडण्यास सुरुवात झाली होती. याची दुर्गंधी लपविण्यासाठी 16 वर्षीय आरोपी रोज रुम फ्रेशनर मारत असे. परंतु, दुर्गंधी लपत नसल्याचे पाहून त्याने आपल्या वडीलांस फोन लावून एका इलेक्ट्रीशनने आईचा खून केल्याचे सांगितले. वडीलांनी तातडीने साधनाच्या भावास कळविले व त्याने पोलिसांत माहिती दिली. पोलिसांनी मृतदेह पाहताच साधनाचा खून दोन-तीन दिवसांपूर्वी झाला असल्याचे समजले. तसेच, आरोपीची 10 वर्षीय बहिणही घाबरलेली असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांनी अधिक विचारपूस केली असता आरोपीचा बनाव लक्षात आला.

आरोपीला ताब्यात घेत अधिक चौकशी केली असता आपल्याला ऑनलाईन गेमची सवय होती. परंतु, आई गेम खेळण्यास नकार देत होती. व त्याला अभ्यास करण्यास सांगत असल्याने त्याने आईची हत्या केली असल्याची कबूली दिली. व पोलिसांनी 16 वर्षीय आरोपीची बालसुधारगृहात रवानगी केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com