नाशिकमध्ये युवकाच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या; नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

नाशिकमध्ये युवकाच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या; नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

देवळालीगाव परिसरात धक्कादायक प्रकार घडला असून 15 वर्षीय अल्पवयीन मुलीने छेड काढणाऱ्या युवकाच्या व त्याच्या कुटूंबियातील व्यक्तीना कंटाळून आत्महत्या केली आहे.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

देवळालीगाव परिसरात धक्कादायक प्रकार घडला असून 15 वर्षीय अल्पवयीन मुलीने छेड काढणाऱ्या युवकाच्या व त्याच्या कुटूंबियातील व्यक्तीना कंटाळून आत्महत्या केली आहे. याबाबत नाशिकरोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवळाली गाव राजवाडा येथील पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलगी ही देवळाली कॅम्प येथील महाविद्यालयात शिकत होती.

रस्त्याने येता जाता गुलाबवाडी येथील कलाम इजहार मन्सूरी (वय 22) हा युवक तिची छेड काढीत लग्न करण्याचा आग्रह करीत होता. त्याचे कुटूंबातील काही लोक देखील आमच्या कलाम बरोबर लग्न करण्यासाठी त्या मुली कडे तगादा लावत होते.

या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीने विहितगांव येथील पुलावर विषारी औषध सेवन केलेले असताना अंजुम सय्यद, साहिल सय्यद यांनी तुमची मुलगी चक्कर येऊन पडली असल्याचे खोटे सांगितले. तीस उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी तीस मयत घोषित केले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com