नागपूरमध्ये अन्न व औषध विभागाची मोठी कारवाई; भेसळयुक्त 688 किलो मिठाई जप्त

नागपूरमध्ये अन्न व औषध विभागाची मोठी कारवाई; भेसळयुक्त 688 किलो मिठाई जप्त

नागपूरमध्ये अन्न व औषध विभागाने मोठी कारवाई केली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

ज्ञानेश्वर पवार, नागपूर

नागपूरमध्ये अन्न व औषध विभागाने मोठी कारवाई केली आहे. दिवाळीच्या दरम्यान विविध कारवाईंमध्ये 688 किलो भेसळयुक्त मिठाई जप्त करण्यात आली असून नागपूरच्या अन्न व औषध प्रशासन विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

विविध कारवाईंमध्ये एकूण 38 लाख रुपयांचे अन्नपदार्थ एफडीएने जप्त केले आहेत. मिठाईचे 52 नमुने घेण्यात आले असून 1 लाख 10 हजार रुपयांचा 688 किलो साठा जप्त करण्यात आला आहे.

तसेच रवा, मैदा, बेसन, कणिक, भगर इत्यादी अन्नपदार्थांचे 140 नमुने घेण्यात आले असून 13 हजार 240 किलोंचा साठा जप्त करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com