पवई येथील एका हॉटेलमध्ये आरोपीसह सापडली महिला पोलीस अधिकारी

पवई येथील एका हॉटेलमध्ये आरोपीसह सापडली महिला पोलीस अधिकारी

मुंबईच्या विलेपार्ले ते बांद्रा दरम्यान एका तासात सहा ते सात मोबाईल चोरी झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती.
Published by :
Team Lokshahi
Published on

रिध्देश हातिम, मुंबई

मुंबईच्या विलेपार्ले ते बांद्रा दरम्यान एका तासात सहा ते सात मोबाईल चोरी झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. गुन्ह्याचे गांभीर्य पाहता पोलिसांनी एक पथक तयार करून आरोपीला शोधण्यास सुरू केले. शोध सुरू असताना पोलिसांना आरोपी हा सराईत गुन्हेगार साबीर शेरअली सय्यद असून आरोपीवर चोरीचे अनेक गुन्हे दाखल होते. खेरवाडी पोलिसांना आरोपीचा मोबाईल नंबर सापडताच मोबाईल लोकेशनच्या मदतीने पोलिसांना समजून आले की आरोपी हा पवई येथील एका हॉटेलमध्ये आहे. त्या अनुषंगाने पोलिसांनी सापळा रचून आरोपीला पवई येथील एका हॉटेलमध्ये पकडले. कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपीसह त्याचा साथीदार बाशीद आणि 3 तरुणींना अटक केले.

अटक केल्यानंतर चौकशी दरम्यान पोलिसांना समजून आले की त्या 3 तरुणींपैकी एक तरुणी मुंब्रा पोलीस ठाण्यातील महिला अधिकारी आहे. या कारवाईत महिला एपीआय विरोधात उपायुक्तांकडे तक्रार अर्ज देण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून खात्यांतर्गत चौकशी सुरू करण्यात आली असून आता वरिष्ठ अधिकारी या प्रकरणात काय भूमिका घेतात. त्या महिला एपीआयवर कोणती कारवाई होणार है पाहणं महत्त्वाचं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com