कोल्हापूर जिल्ह्यात राधानगरी तालुक्यातील धामणी नदीवरील बंधारा फुटला
कोल्हापूर जिल्ह्यात राधानगरी तालुक्यातील धामणी नदीवरील बंधारा फुटला आहे. नजीक असणाऱ्या शेतीमध्ये पाणी घुसल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. पाण्याच्या प्रचंड आलेल्या दाबामुळे आज सकाळी 7 वाजता हा बंधारा वाहून गेला. शेती व पिण्याच्या पाण्यासाठी असे मातीचे बंधारे येथे दरवर्षी घातले जातात.
म्हासुर्ली (ता. राधानगरी) येथील धामणी नदीवर शेतकरी स्वखर्चातून मातीचे बंधारे घालण्याचे काम करत आहेत. धामणी नदीवर 9 ठिकाणी असे बंधारे घालण्याचे काम सुरू आहे.ऐन मे महिन्यात धामणी नदी कोरडी पडते. येथे शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनतो. त्यामुळे चौके ते पनोरेपर्यंत नऊ ठिकाणी धामणी नदीवर शेतकरी स्वखर्चातून मातीचे बंधारे घालतात.
नोव्हेंबर महिन्यात मातीचा बांध घालताना शेतकऱ्यांच्या लक्षात आल्याने पाटबंधारे विभागाच्या निकृष्ट कामाचा पंचनामा झाला आहे. शासनाचे लाखो रुपये पाण्यात गेले आहेत. संबंधित सर्वच बंधाऱ्याच्या कामाची तसेच अधिकारी व ठेकेदारांची चौकशी करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.