Pune Lavasa Landslide: पुण्यातील लवासामध्ये 2 ठिकाणी कोसळली दरड;  दरडीखाली काही नागरिक अडकल्याची माहिती

Pune Lavasa Landslide: पुण्यातील लवासामध्ये 2 ठिकाणी कोसळली दरड; दरडीखाली काही नागरिक अडकल्याची माहिती

पुणे शहरांसह जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. नागरिकांना रेस्क्यू करण्याचं काम अग्निशामक दलाकडून केलं जात आहे
Published by :
Dhanshree Shintre
Published on

पुणे शहरांसह जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. नागरिकांना रेस्क्यू करण्याचं काम अग्निशामक दलाकडून केलं जात आहे. अनेक गाड्या अडकून पडल्या आहेत. अशातच आता पुण्यातील लवासा हिल स्टेशनवर दरड कोसळल्याची घटना समोर आली आहे.

पुण्यातील लवासामध्ये 2 ठिकाणी दरड कोसळली आहे. या घटनेमध्ये 2 ते 4 जण बेपत्ता झाले आहेत. लवासाच्या पुनर्वसित रामनगरमध्ये दरड कोसळली. लवासातल्या काही बंगल्यांवर दरड कोसळल्याची माहिती आहे. बंगल्यातल्या दरडीमध्ये काही नागरिक अडकल्याची माहिती आहे. पण अद्याप कोणीच घटनास्थळी आले नाही.

दरड कोसळल्याने ग्रामस्थांचंही नुकसान झाले आहे. स्थानिक नागरिकांनी जिल्हा प्रशासनाला याबाबत माहिती दिली. या घटनास्थळावरील फोटो आणि व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत. या विक्रमी पावसाचा फटका लवासा हिल स्टेशन या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना बसला आहे. याठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Pune Lavasa Landslide: पुण्यातील लवासामध्ये 2 ठिकाणी कोसळली दरड;  दरडीखाली काही नागरिक अडकल्याची माहिती
Ulhas River: उल्हास नदीला पूर! नदीकाठच्या गावांना देण्यात आला सतर्कतेचा इशारा
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com