आमदार संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल

आमदार संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल

संतोष बांगर यांच्यावर पैसे वाटप करत असल्याचा आरोप
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात

  • शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल

  • शिवाजी मानेंच्या तक्रारीवरून कळमनुरी पोलील ठाण्यात गुन्हा दाखल

  • बांगर यांच्यावर पैसे वाटप करत असल्याचा आरोप

आमदार संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजी माने यांनी आमदार बांगर यांच्या विरोधामध्ये कळमनुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

कोणतीही परवानगी नसताना मंडप टाकून साऊंड सिस्टिम लावून बेकायदेशीररित्या लोकांना जमवत पैसे वाटप करून आचारसंहितेचा भंग केला जात असून काल दुपारी तीन ते चार वाजण्याच्या सुमारास वाकडी गावाजवळ कारखान्याच्या बाजूला असलेल्या माळरानावावर अंदाजे 2000 च्या वर महिला एकत्र जमवून संतोष बांगर व त्यांचे कार्यकर्ते महिलांना मतदानासाठी पैसे वाटप करत आहेत अशी तक्रार नोंदवण्यात आली.

याच पार्श्वभूमीवर आता तक्रारीनंतर कळमनुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता आमदार संतोष बांगर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com