रस्ता ओलांडणाऱ्या शाळकरी मुलीला वाचवताना कार उलटली; एक ठार; आठ जण गंभीर जखमी

रस्ता ओलांडणाऱ्या शाळकरी मुलीला वाचवताना कार उलटली; एक ठार; आठ जण गंभीर जखमी

कारचे टायर फुटले असून मोठे नुकसान झाले आहे. कारमधील विजय डेरे यांचा मृत्यू झाला झाला.
Published by :
shweta walge
Published on

आदेश वाकळे, संगमनेर : संगमनेर तालुक्यातील पठार भागातील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर डोळासणे गावच्या शिवारातील बांबळेवाडी परिसरात पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग ओलांडणाऱ्या शाळकरी मुलीला वाचवताना भरधाव कारवरील चालकाने अचानक कारचा ब्रेक दाबल्याने कार उलटली. या भीषण अपघातात कारमधील एकजण जागीच ठार झाला तर शाळकरी मुलीसह आठजण गंभीर जखमी झाले असल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

नाशिक येथे अस्थी विसर्जन करून डेरे कुटुंब कार क्रमांक एम.एच.१४ के.बी. ८७१४ मधून नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गाने पुण्याच्या दिशेने नारायणगाव येथे घरी परतत होते. याच दरम्यान, दुपारी तीन वाजेच्या सुमारास ते बांबळेवाडी शिवारात आले असता वैष्णवी मेंगाळ ही शाळकरी मुलगी दुभाजकाच्या झाडा झुडपातून अचानक रस्ता ओलांडण्यासाठी रस्त्यावर अचानक आली असता. कार चालक विनायक डेरे यांनी मुलीला वाचविण्यासाठी भरधाव वेगात असलेल्या कारचा ब्रेक दाबल्याने कार पाच ते सहा वेळा पलटी होऊन ५०० मीटरवर महामार्गाच्या खाली जाऊन आदळली.

यात कारचे टायर फुटले असून मोठे नुकसान झाले आहे. कारमधील विजय डेरे यांचा मृत्यू झाला झाला. तर शाळकरी मुलगी वैष्णवी मेंगाळ आणि कारमधील प्रवासीसह आठजण गंभीर जखमी झाले आहेत.

रस्ता ओलांडणाऱ्या शाळकरी मुलीला वाचवताना कार उलटली; एक ठार; आठ जण गंभीर जखमी
Buldhana Accident : दारूच्या नशेत पोलिसाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं; 3 वाहनांना धडक
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com