बापरे! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उडवून देण्यासाठी बॉम्ब; आयटी इंजीनियरचा पोलिसांना कॉल
पुणे : पुण्यातील किवळे येथे एक धक्कादायक प्रकार समोर येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उडवून देण्यासाठी एका ठिकाणी बॉम्ब बनवत असल्याचा कॉल आयटी इंजीनियरने पोलीस नियंत्रण कक्षास केला. यामुळे एकच खळबळ उडाली होती. परंतु, हा कॉल फेक असल्याची माहिती उघडकीस आली आहे.
मनोज अशोक हंसे असे पोलीस नियंत्रण कक्षास कॉल करणाऱ्या इसमाचे नाव असून हा एक आयटी इंजिनिअर आहे. या आयटी इंजिनिअरने पोलीस नियंत्रण कक्षास कॉल करुन सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उडून देण्यासाठी एका ठिकाणी बनत आहेत. यानंतर देहूरोड पोलिसांनी तातडीने घटनास्थळावर जाऊन माहिती घेतली असता हा फेक कॉल केला असल्याची माहिती समोर आली. शेजाऱ्यांना अडचणीत आणण्यासाठी आयटी इंजीनिअरने नियंत्रण कक्षास कॉल असल्याचे समजत आहे.
मनोज हंसेला ताब्यात घेण्यासाठी पोलीस अधिकारी आरोपीच्या घरी गेले असता पोलीस अधिकाऱ्यांच्या अंगावर आरोपीने गाडी घातली. मोठ्या शिताफीने मनोज हंसेला ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, त्याच्या चौकशीसाठी केंद्रीय तपास संस्था पुण्यात दाखल झाली असून मनोजची चौकशी सुरू आहे.