गोरेगाव आणि मालाड स्थानकांदरम्यान ब्लॉक घेण्यात येणार; जाणून घ्या काय असेल वेळ?
गोरेगाव आणि मालाड स्थानकांदरम्यान ब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. पश्चिम रेल्वेच्या 175 लोकल रद्द होणार आहेत. ब्लॉकमुळे पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांचे हाल होणार आहेत. आज रात्री 12.30 ते उद्या पहाटे 4.30 वाजेपर्यंत हा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
ब्लॉक कालावधीत जलद मार्गावरील लोकल चर्चगेट ते अंधेरी आणि विरार ते बोरिवली स्थानकांदरम्यान चालविण्यात येणार आहेत शेवटची चर्चगेट-विरार लोकल रात्री 11.27 वाजता स्थानकातून सुटणार आहे.
गोरेगाव ते सीएसएमटी या मार्गावर गोरेगावहून रात्री 12.०7 वाजता शेवटची लोकल सुटणार आहे तसेच बोरिवलीहून चर्चगेटसाठी रात्री 12.10 वाजता शेवटची लोकल सुटेल यासोबतच विरारहून चर्चगेटसाठी रात्री ११.३० वाजता शेवटची लोकल सुटणार असल्याची माहिती मिळत आहे.
पश्चिम रेल्वेवरील गोरेगाव ते कांदिवली स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गिकेचे काम करण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात आला असून अप आणि डाऊन मेल, एक्सप्रेस अंदाजे 10 ते 20 मिनिटे उशिरा धावणार असल्याची माहिती आहे.