मुंबईत पोलिसांची मोठी कारवाई, 1 कोटींचे ड्रग्ज जप्त, एका व्यापाऱ्याला अटक

मुंबईत पोलिसांची मोठी कारवाई, 1 कोटींचे ड्रग्ज जप्त, एका व्यापाऱ्याला अटक

मुंबईतील दिंडोशी पोलिसांनी गोरेगावच्या संतोष नगर परिसरातून एक कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले असून एका तस्कराला अंमली पदार्थांसह अटक केली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

मिनाक्षी म्हात्रे, मुंबई

मुंबईतील दिंडोशीत पोलिसांनी गोरेगावच्या संतोष नगर परिसरातून एक कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले असून एका तस्कराला अंमली पदार्थांसह अटक केली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, बुधवारी रात्री पोलिस गस्त घालत असताना रत्नागिरी हॉटेलजवळ एक व्यक्ती संशयास्पद स्थितीत दिसला, पोलिस त्याच्याकडे चौकशीसाठी पोहोचले आहे.

पोलिसांना पाहून तो पळू लागला, पोलिसांनी आरोपीला पकडले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याच्याजवळील बॅगमधून 270 ग्रॅम हेरॉईनचे ड्रग्ज जप्त करण्यात आले असून, जप्त केलेल्या ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 1 कोटी 8 लाख रुपये आहे.

आरोपी विरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला १५ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com