गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रभादेवी पोलिसांनी मोठा निर्णय; स्वागत मंडप उभारण्यास नकार
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रभादेवी पोलिसांनी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. एकनाथ शिंदे आणि 40 आमदार बाहेर पडले. शिंदे यांच्या बंडानंतर काही शिवसेने फूट पडली. सदा सरवणकर हे शिंदेंच्या बंडात सहभागी होते. त्यामुळे शिवसेना उद्धव ठकरे गटातील पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी तिसरा मंडप उभारला. यावरुन गेल्या वर्षी प्रभादेवी परिसरात याच कारणावरून राडा आणि गोळीबार झाला होता.
याच पार्श्वभूमीवर आता शिवसेना, शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि मनसे या तीनही पक्षांना स्वागत मंडप उभारण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. गणेश विसर्जनच्या दिवशी प्रभादेवी परिसरात शिवसेना ठाकरे गटाकडून गणेश भक्तांचे स्वागत करण्यासाठी मंच उभारण्यात आला होता. या मंचाच्या शेजारी शिंदे गटाने देखील आपला मंच उभारला होता. त्या दरम्यान, दोन्ही गटात वाद झाला होता.
पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देत तिन्ही पक्षांना मंडप उभारण्याची परवानगी नाकारली आहे. तिन्ही पक्षांना प्रभादेवी परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी गणेशोत्सव साजरा करण्याची परवानगी देण्यात आली आहे.