विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे पोलिसांची मोठी कारवाई: शस्त्रांसह आरोपी ताब्यात

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे पोलिसांची मोठी कारवाई: शस्त्रांसह आरोपी ताब्यात

विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

विशाल ठाकूर, धुळे

विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. याच विधानसभा निवडणुकीचा पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा पोलीस दलाने मोठी कामगिरी केली आहे.

पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीत 16 तलवारी, 6 गावठी कट्टे, वाहनासह विदेशी दारू, शेकडो गुंगीच्या नशेच्या बाटल्यांसह आठ आरोपी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

जिल्हाभरातील नाकाबंदीत विविध कारवायांमध्ये लाखोंचा मुद्देमाल हस्तगत करत अनेक आरोपींवर कारवाई करण्यात आली असून पोलिसांचं ऑल आऊट मोहीम सुरूच राहणार, गुन्हेगारांवर कारवाई होणारच अशी माहिती पोलीस अधीक्षकांची दिली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com