ताज्या बातम्या
रेसकोर्सवर 300 एकरात आंतरराष्ट्रीय दर्जाचं उद्यान होणार
महालक्ष्मी रेस कोर्सची 120 एक्कर जागा अखेर मुंबई महापालिकेच्या ताब्यात देण्यास राज्य सरकारची मंजुरी देण्यात आली आहे.
महालक्ष्मी रेस कोर्सची 120 एक्कर जागा अखेर मुंबई महापालिकेच्या ताब्यात देण्यास राज्य सरकारची मंजुरी देण्यात आली आहे. गार्डन, ओपन स्पेस, नियोजित थीम पार्क या सुविधा करण्यात येणार आहेत. ही जागा आता रेसकोर्सची जागा सेंट्रल पार्क, ओपन स्पेस, गार्डनसाठी वापरण्यात येणार आहे.
याच पार्श्वभूमीवर आता रेसकोर्सवर 300 एकरात आंतरराष्ट्रीय दर्जाचं उद्यान होणार असून आतंरराष्ट्रीय उद्यानाला राज्य मंत्रिमंडळाकडून मंजुरी देण्यात आली आहे.
रेसकोर्सची 120 एकर आणि सागरी किनाऱ्यालगतची 180 एकर जागा वापरुन हे उद्यान होणार आहे. रेसकोर्सची 120 एकर जागेचा ताबा लवकरच महापालिकेला मिळणार असल्याची माहिती मिळत आहे.