ताज्या बातम्या
काँग्रेस अध्यक्षपदासाठी देशभरात 96 टक्के मतदान, 19 ऑक्टोबरला होणार निकाल जाहीर
राज्यातील 561 प्रदेश प्रतिनिधी पैकी आज 542 जणांनी आपला मतदानाचा हक्क बजावला
काँग्रेसच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीची अनेक दिवसांपासुन चर्चा सुरु होती. अखेर अध्यक्ष पदासाठी आज मतदान पार पडले. आज झालेल्या काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून देशभरात 40 केंद्रांवर 68 बूथ स्थापन करण्यात आले होते. सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया पार पडेल. 96 टक्के मतदान आज काँग्रेस अध्यक्षपदासाठी आज करण्यात आले आहे.
या निवडणुकीसाठी मल्लिकार्जुन खरगे आणि शशी थरूर हे दोन उमेदवार असणार आहे. या उमेदवाऱ्यांना सुमारे 9800 राज्य प्रतिनिधीनी मतदान केले आहे. राज्यातील 561 प्रदेश प्रतिनिधी पैकी आज 542 जणांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. खरगे की थरूर या उमेदवारांपैकी कोण अध्यक्ष पदाच्या खुर्चीवर बसेल, याचा फैसला 19 ऑक्टोबरला होणार आहे.