8व्या वेतन आयोगात केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार किती असेल?
8th Pay Commission : जर तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती केंद्र सरकारचे कर्मचारी असाल तर त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून 8व्या वेतन आयोगाची चर्चा सरकारी विभागात सुरू आहे. 8 वा वेतन आयोग लागू झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी झेप होईल. आता लागू झालेल्या 7व्या वेतन आयोगाअंतर्गत कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन (किमान वेतन मर्यादा) 18,000 रुपये आहे. (8th pay commission central govt employees to get huge salary hike check salary)
फिटमेंट फॅक्टरमध्ये सुधारणा करण्याची मागणी
पगार ठरवण्यात फिटमेंट फॅक्टरची मोठी भूमिका असते. फिटमेंट फॅक्टरमध्ये सुधारणा करण्याची मागणी अनेक दिवसांपासून सरकारी कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे. फिटमेंट फॅक्टरच्या आधारे, सुधारित मूळ वेतन जुन्या मूळ वेतनावरून मोजले जाते आणि नवीन वेतन ठरवले जाते. वेतन आयोगाच्या अहवालात फिटमेंट फॅक्टर ही महत्त्वाची शिफारस आहे. त्या आधारे पगारवाढीचा निर्णय घेतला जातो.
किमान पगार १८ हजारांवरून २६ हजार होणार!
7व्या वेतन आयोगानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा फिटमेंट फॅक्टर 2.57 पट ठेवण्यात आला आहे. त्याआधारे कर्मचाऱ्यांच्या वेतनात सुधारणा करण्यात आली. आकडेवारीवर नजर टाकली तर 7व्या वेतन आयोगात आतापर्यंतची सर्वात कमी पगारवाढ झाली आहे. यामध्ये किमान मूळ वेतन 18000 रुपये करण्यात आले आहे. आता फिटमेंट फॅक्टर 3.68 पट वाढवल्यास किमान वेतन 18 हजार रुपयांवरून 26 हजार रुपयांपर्यंत वाढू शकते, अशी चर्चा आता सरकारी विभागांमध्ये सुरू आहे.
वेतन आयोग आणि पगारवाढ
4था वेतन आयोग फिटमेंट फॅक्टर
पगार वाढ : 27.6%
किमान वेतन : रु 750
5 वा वेतन आयोग फिटमेंट फॅक्टर
पगारवाढ : 31%
किमान वेतन स्केलः रु 2,550
6 वा वेतन आयोग फिटमेंट फॅक्टर
फिटमेंट फॅक्टर: 1.86 पट
पगार वाढ: 54%
किमान वेतन: रु 7,000
7 वा वेतन आयोग फिटमेंट फॅक्टर
फिटमेंट फॅक्टर: 2.57 पट
पगारवाढ: 14.29%
किमान वेतन: रु. 18,000
8 वा वेतन आयोग फिटमेंट फॅक्टर
फिटमेंट फॅक्टर: ?
वेतन वाढ:?
किमान वेतन: ?
8 व्या वेतन आयोगावर वेगवेगळी मते
सातव्या वेतन आयोगानंतर आठवा वेतन आयोग येणार नसल्याचा दावा प्रसारमाध्यमांच्या पहिल्या बातम्यांमध्ये केला जात होता. पण आता भागीदार वेबसाइट झी बिझनेसनुसार, 8 व्या वेतन आयोगाबाबत वेगवेगळ्या विभागांचे दोन भिन्न विचार आहेत. सरकार पुढील वेतन आयोगाचा विचार करणार नसल्याचे सरकारी सूत्रांचे म्हणणे आहे. असे होणे शक्य नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ही एक अशी व्यवस्था आहे जी अचानक थांबवता येत नाही. दुसरे मोठे कारण म्हणजे 8 वा वेतन आयोग यायला अजून वेळ आहे. 2024 मध्ये लोकसभेच्या निवडणुकाही होणार आहेत. अशात केंद्रीय कर्मचाऱ्यांना नाराज करण्याचा धोका कोणताही राजकीय पक्ष घेणार नाही. त्यामुळे पुढील वेतन आयोग येईल आणि तो 1 जानेवारी 2026 पासून लागू मानला जाईल.
मूळ पगारात 8000 रुपयांची संभाव्य वाढ
पे-लेव्हल मॅट्रिक्स 1 मधील केंद्रीय कर्मचाऱ्यांचे किमान वेतन 26,000 रुपयांपासून सुरू होऊ शकते. त्यानुसार पे मॅट्रिक्स लेव्हल-18 पर्यंत पगार वाढणार आहे. वेतन आयोगाचा पूर्वीचा कल पाहिला तर तो दर 8-10 वर्षांनी लागू होतो. आता 1 जानेवारी 2026 पासून 8 वा वेतन आयोग लागू होणार असल्याचे बोलले जात आहे.