7th Pay Commission|Central Government |Central Employees
7th Pay Commission|Central Government |Central Employeesteam lokshahi

7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याची तयारी, महागाई भत्त्यात होणार सर्वात मोठी वाढ

महागाई भत्त्यात 5 टक्क्यांनी होणार वाढ
Published by :
Shubham Tate
Published on

7th Pay Commission Update News : केंद्र सरकारचे (Central Government) कर्मचारी 1 जुलै 2022 पासून या वर्षीच्या दुसऱ्या टप्प्यातील महागाई भत्त्याच्या वाढीच्या प्रतीक्षेत आहेत. असे मानले जात आहे की 1 जुलै 2022 पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठ्या भेटवस्तूंची घोषणा केली जाऊ शकते. देशातील वाढती महागाई, EMI महाग होत असल्याने केंद्र सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात मोठी वाढ करणार आहे. (7th pay commission da hike da hike latest news 2022 central government employees)

1 जुलै 2022 पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात मोठी वाढ होऊ शकते. यापूर्वी असे मानले जात होते की महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ केली जाईल. परंतु, औद्योगिक कामगारांसाठीच्या अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकाच्या अलीकडील आकडेवारीनंतर, महागाई भत्ता 4 टक्क्यांवरून 5 टक्क्यांपर्यंत वाढवला जाण्याची शक्यता आहे.

सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना (Central Employees) 34 टक्के महागाई भत्ता मिळतो. यापूर्वी ते 38 टक्क्यांपर्यंत वाढवणे अपेक्षित होते. मात्र आता महागाई भत्त्यात 5 टक्क्यांनी वाढ होणार असल्याचे मानले जात आहे. एप्रिल महिन्यातील अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकाच्या आकडेवारीवरून हा अंदाज वर्तवला जात आहे.

7th Pay Commission|Central Government |Central Employees
Umang App : पासपोर्ट बनवण्यापासून ते अनेक ऑनलाइन काम आता घरबसल्या चुटकीसरशी होणार

देशातील वाढती महागाई पाहता जुलै महिन्यात सरकार महागाई भत्ता (DA) वाढवण्याचा विचार करत आहे. असे झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे. केंद्रीय कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता 34 टक्क्यांवरून 39 टक्क्यांपर्यंत वाढवल्यास केंद्रीय कर्मचार्‍यांचा पगार 8,000 रुपयांवरून 27,000 रुपयांपर्यंत वाढू शकतो.

आकडेवारीनुसार, केंद्र सरकारच्या या निर्णयाचा परिणाम 47 लाख कर्मचारी आणि 68 लाख पेन्शनधारकांवर होणार आहे. महागाईसोबतच ईएमआयही महाग होत आहे, अशा परिस्थितीत महागाई भत्त्यात वाढ केल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. सर्वसाधारणपणे 1 जानेवारी आणि 1 जुलैपासून महागाई भत्ता वाढवण्याचा ट्रेंड आहे, अशा स्थितीत जुलै महिन्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांना आनंदाची भेट मिळू शकते.

केंद्र सरकार किरकोळ महागाईच्या आकडेवारीच्या आधारे जानेवारी आणि जुलै महिन्यात वर्षातून दोनदा DA आणि DR मध्ये सुधारणा करते. देशातील महागाई RBI च्या अंदाजापेक्षा वर पोहोचली आहे. किरकोळ महागाई RBI च्या सहनशीलतेच्या 6 टक्क्यांच्या वर गेली आहे. किरकोळ महागाईचा दर मार्चमध्ये 6.95 टक्क्यांवरून एप्रिलमध्ये 7.79 टक्क्यांवर पोहोचला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com