Satara Mahu Dam Latest Update
Satara Mahu DamLokshahi

Satara Mahu Dam: साताऱ्यात पावासानं घातला धुमाकूळ! महू धरण तुडुंब, ७०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग

जुलै महिन्यात पावसानं रौद्ररुप धारण केल्यानं महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पुरस्थिती निर्माण झाली आहे. नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले असून धरणांमध्येही मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा तयार झाला आहे.
Published by :
Naresh Shende
Published on

Satara Mahu Dam Water Update : जुलै महिन्यात पावसानं रौद्ररुप धारण केल्यानं महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पुरस्थिती निर्माण झाली आहे. नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले असून धरणांमध्येही मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा तयार झाला आहे. सातारा जिल्ह्यालाही पावसानं झोडपलं असून महू धरण १०० टक्के भरलं आहे. या धरणातून ७०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.

साताऱ्यात जावळी तालुक्यात मुसळधार पाऊस पडल्याने महू धरण ओसंडून वाहू लागले आहेत. कुडाळ करहर उडतरे सर्जापूर परिसरातील नदीकाठच्या गावांना धोक्याचा इशारा देण्यात आलेला आहे. या परिसरात येत्या 24 तासात रेड अलर्ट जारी करण्यात आल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. तसच प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com