Alcohol Drinking : धक्कादायक; रविवारी प्यायले दारु, दुसऱ्या दिवशी दारु प्यायलेल्या सातही जणांचा मृत्यू!
तुम्ही कधी ऐकले आहे का की, दारु प्यायली आणि मृत्यू झाला. अशाच एक धक्कादायक प्रकार पश्चिम बंगालच्या हावडामध्ये (Howrah, West Bangal) घडला आहे. दारु पिऊन (liquor Drinking) जात जणांचा मृत्यू झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे. रविवारी रात्री दारु प्यायलेल्यांपैकी सात जणांचा मृत्यू झाला. विषारी दारु प्यायलाने (Poisonous Alcohol ) मृत्यू झाला की त्यांनी बेकायदेशीर दारुचं सेवन केलं होतं, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या घटनेनंतर स्थानिकांनी तीव्र संतापही व्यक्त केला जातोय.
दारुचं दुकान चालवणाऱ्याला पोलिसांनी सात जणांच्या मृत्यूनंतर अटक केली आहे. त्याला पोलिसांच्या हवाले करण्यासाठी स्थानिक बेदम चोप दिलाय. आता या दारु विक्रेत्याची चौकशी केली जातेय. मात्र या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दारु पिणाऱ्यांनी या घटनेची धास्ती घेतली असून आता पुढील तपास केला जातो आहे. पोलिसांनी त्यासाठी दारुचे नमुनेही फॉरेन्सिक चाचणीसाठी पुढे प्रयोगशाळेत पाठवले आहेत.
फॉरेन्सिक टीमकडून आता या नमुन्यांचीच चाचणी केली जाईल. आता या चाचणीतून नेमकी काय माहिती समोर येते, हे पाहणं महत्त्वाचं आहे. उत्पादन शुल्क विभागाने मात्र दारुवर संशय व्यक्त केला आहे. दारुमध्ये जीवघेणी रसायनं असू शकतात आणि त्याच्या सेवनामुळे तब्बेत बिघडून सात जणांचा मृत्यू झालेला असू शकतो, अशी शंका घेतली आहे.