Sidhu Moose Wala Murder: सिद्धू मूसेवाला हत्याकांडात मोठी बातमी, उत्तराखंडमधून 6 संशयित ताब्यात
पंजाबी गायक-राजकारणी सिद्धू मुसेवाला (Sidhu Moosewala) यांची रविवारी (29 मे) पंजाबमधील मानसा जिल्ह्यातील जवाहर गावाजवळ अज्ञात बंदूकधाऱ्यांनी हत्या केली. पंजाब पोलिसांनी (Punjab Police) दावा केला आहे की, गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई, गोल्डी ब्रार आणि त्यांचे साथीदार या हत्येत सामील आहेत. तर दुसरीकडे सिद्धू मुसेवाला (Sidhu Moose Wala) यांच्या हत्येत मदत करणाऱ्यांना उत्तराखंडमधील (Uttarakhand) डेहराडूनमध्ये पकडण्यात आले असून, पंजाब पोलीस संबंधितांना घेऊन रवाना झाल्याचे सांगितले जात आहे.
हेमकुंड साहिबला जाणाऱ्या यात्रेकरूंमध्ये तो लपला होता. पंजाब आणि उत्तराखंड पोलिसांच्या संयुक्त पथकाने त्याला ताब्यात घेतले. संशयिताला आता पंजाबला नेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
डेहराडूनमधून ताब्यात घेतलेल्या संशयितांपैकी एक लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi) टोळीचा सदस्य असल्याचे सूत्रांनी सांगितले. या टोळीने गायक मुसेवाला यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. याशिवाय उत्तराखंडमधून ताब्यात घेतलेल्या आणखी पाच संशयितांनाही पंजाबमध्ये नेले जात आहे.