मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे ठाणे पालिकेच्या पिसे पम्पिंग स्टेशन, तसेच स्टेम प्राधिकरणाच्या शहाड पम्पिंग स्टेशन येथील नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ, कचरा जमा झाला आहे.
याच पार्श्वभूमीवर ठाण्यात तीन दिवस 50 टक्के पाणीकपात करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. पम्पिंग स्टेशनच्या दुरुस्तीसाठी पालिकेने हा निर्णय घेतला आहे.
ठाण्यासह जिल्ह्यातील धरण क्षेत्रात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. या जोरदार पावसामुळे शहाड पम्पिंग स्टेशन येथील नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ, कचरा जमा झाला त्यामुळे पूर्ण क्षमतेने पाणी उपसा होत नसून शुद्धीकरणाच्या प्रक्रियेवर परिणाम होत असल्याने पम्पिंग स्टेशनच्या दुरुस्तीसाठी तीन दिवस ५० टक्के पाणी कपात होणार आहे.