CM Eknath Shinde
CM Eknath Shinde

घाटकोपरच्या होर्डिंग दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत, दोषींवर कारवाई करण्यासाठी CM शिंदेंनी दिल्या सूचना

मुंबईत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळल्यानं घाटकोपरमध्ये पूर्व द्रुतगतीमार्गाच्या पेट्रोलपंपाजवळ असलेलं महाकाय होर्डिंग्ज कोसळलं. या दुर्घटनेत ४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीय.
Published by :
Naresh Shende
Published on

Ghatkopar Hording Collapse Incident : मुंबईत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळल्यानं घाटकोपरमध्ये हायवेजवळ असलेल्या पेट्रोलपंपावरील महाकाय होर्डिंग्ज कोसळलं. या होर्डिंगखाली जवळपास ८० गाड्या दबल्या आहेत. तर या दुर्घटनेत ४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीय. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांना राजावाडी रुग्णालयात उपाचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या कुटंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ५ लाख रुपयांची मदत जाहीर केलीय.

माध्यमांना प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, होर्डिंगच्या घटनेबाबात महापालिका आयुक्तांना सूचना दिल्या आहेत. रेस्क्यू ऑपरेशन सुरु करण्यासाठीही सूचना दिल्या. रेस्क्यू ऑपरेशन सुरु झालं असून ५७ लोकांना बाहेर काढलं आहे. राजावाडी रुग्णालयात दाखल असलेल्या लोकांवर उपचार सुरु आहेत. क्रेन लावून होर्डिंग उचलण्याचं काम सुरु आहे. होर्डिंगच्या दुर्घटनेबद्दल चौकशी करण्याच्या सूचना आम्ही दिल्या आहेत.

सर्व होर्डिगचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी महापालिका आयुक्तांना सांगण्यात आलं आहे. जे होर्डिंग विनापरवाना आणि बेकायदेशीरपणे लावण्यात आले आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. जखमींचा सर्व उपचाराचा खर्च सरकार करेल. या दुर्घटनेत जे मृत्यूमुखी पडले आहेत, त्यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ५ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात येत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com