कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची 5 गेमचेंजिंग आश्वासनं; मोफत शिक्षण ते मुंबईत घरं...
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांनी कंबर कसली आहे. सर्वांनी प्रचाराला सुरूवात केली आहे. यातच आज कोल्हापुरात राधानगरी मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाच्या प्रचाराला सुरुवात झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी महायुतीवर जोरदार टीका केली आहे. तसच राज्यातील जनतेला अनेक आश्वासने दिली. उद्धव ठाकरे यांनी दिलेली 5 आश्वासनं गेमचेंजर ठरण्याची शक्यता आहे.
1. राज्यातील मुलं आणि मुलींसाठी सरकारकडून मोफत शिक्षणाची योजना लागू केली जाईल. मुलगा आणि मुलगी दोघेही कुटुंबाचे आधारस्तंभ असतात. त्यामुळे मुलांनाही मोफत शिक्षण मिळणे गरजेचे असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
2. महिलांना पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवताना अनेकदा आव्हानांना सामोरं जावं लागतं. यावर समाधानकारक उपाय म्हणून राज्यात मविआची सत्ता आल्यास महिला पोलिसांची भरती केली जाईल. पोलीस ते वरिष्ठ पदांवर महिला अधिकारी असलेले पोलीस ठाणे सुरु करण्यात येईल.
3. धारावीमध्ये सध्या असलेल्या मुंबईच्या गरीब आणि मार्जिनलाइझ केलेल्या लोकांना उद्योगधंद्यांसह परवडणारी घरे दिली जातील." मुंबईतल्या भूमिपुत्रांना त्यांच्या हक्काचं घर देण्यासाठी मविआ सरकार कार्यरत होईल, असं आश्वासन उद्धव ठाकरेंनी दिलं. यावेळी ठाकरे यांनी कोल्हापूरकरांना म्हटलं, "मुंबई तुमची आहे, मराठी माणसाची आहे. याच मुंबईसाठी तुमचं हक्क आहे."
4. शेतकऱ्यांच्या हितासाठी मविआ सरकार पावलं उचलणार. "आमच्या सरकारच्या कार्यकाळात शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले होते. परंतु सरकार पडलं, त्यामुळे शेतकऱ्यांचा कर्जमुक्तीचा मुद्दा थांबला. आमच्या पुनरागमनानंतर हमीभाव दिला जाईल आणि शेतमालावर भरीव मदत दिली जाईल.
5. त्यांच्या सरकारच्या कार्यकाळात जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर होत्या आणि तोच त्रास राज्यभर अनुभवला जातोय. "आम्ही सरकारला पुन्हा आले, तर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींमध्ये कोणताही बदल होणार नाही. डाळ, तांदूळ, साखर, तेल यासारख्या वस्तूंच्या किमती आम्ही स्थिर ठेवू," असं ते म्हणाले.
महायुतीवर टीका करत म्हणाले की, आज जे आम्ही भोगत आलो, तेच आज सांगतोय. या सरकारच्या कंत्राटधारकांनी राज्याला लुटायला सुरुवात केली आहे." त्यांनी मोदी-शाह यांना उद्देशून आक्षेप घेतले, "ते महाराष्ट्रात १५ दिवस राहून नेत्यांना कसा समजावून सांगतात, ते पाहा." यावेळी उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना आग्रह केला, "पुढील १५ दिवस महाराष्ट्रात ठाण मांडून तुम्ही कार्यप्रणाली जरा तपासून पाहा अस ते म्हणाले.