Amarnath Yatra : अमरनाथजवळ सांगलीतील 47 जणांचा ग्रुप अडकला; रेस्क्यू ऑपरेशन सुरु
अमरनाथमध्ये (Amarnath Cave) झालेल्या ढगफुटीमुळे 16 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 65 लोकांना वाचवण्यात यश आलं आहे.
या घटनेत अद्याप 41 जण बेपत्ता असून त्यांचा शोध सुरु आहे. खराब हवामानामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत. आज देखील हवामान खराब असल्यानं अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली असून बचावकार्य अजून सुरु आहे.
अमरनाथ यात्रेसाठी (Amarnath Yatra) सांगली जिल्ह्यातील 47 जणांचा ग्रुप गेला होता. अमरनाथ गुहेखाली असलेल्या तंबुमध्ये ते मुक्कामास होते. हा ग्रुप दर्शनासाठी गेला आणि अचानक ढगफुटी होऊन त्यांचे तबु गाडले गेले. मात्र ते सर्व बचावले आहेत.
यंदा 30 जूनपासून ही यात्रा (Amarnath Yatra) सुरू झाली होती. 43 दिवस चालणाऱ्या या यात्रेची 11 ऑगस्ट रोजी सांगता होणार होती. पण सध्या खराब हवामानामुळे ही यात्रा स्थगित करण्यात आली आहे.
या ढगफुटीमध्ये यात्रेसाठी गेलेले असंख्य लोक अडकले आहेत. त्यांना वाचवण्यासाठी प्रशासनाकडून बचावकार्य सुरु आहे. मृतांची संख्या वाढून 16 वर पोहोचली आहे. ज्यामध्ये 7 पुरुष आणि 6 महिलांचा समावेश आहे. तर आणखी 2 मृतदेहांची ओळख पटलेली नाही. या सर्व रुग्णांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.