Navi Mumbai
Navi MumbaiTeam Lokshahi

Navi Mumbai : उड्डाणपुलासाठी मुंबईत तब्बल 400 झाडांचा बळी; भाजपाचे आंदोलन

आज नवी मुंबईत राजकीय पक्षांचं आंदोलन
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

वाशीतील (Vashi) अरेंजा कॉर्नर ते कोपरी उड्डाणपुलापर्यंत प्रस्तावित उड्डाणपुलासाठी तब्बल ३९० झाडांवर कुऱ्हाड पडणार आहे.

गणेश नाईक म्हणाले की, "नवी मुंबईला A++ अशी रेटिंग होती ती नष्ट करण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे. हे प्रकल्प जनतेसाठी नसून जनतेला त्रास देण्यासाठी सुरू करण्यात आले आहेत."

यासोबतच ते म्हणाले की, "400 झाडं तोडून गरज नसताना सरकारकडून तब्बल 350 कोटी रूपये खर्च करून उड्डाणपूल उभारल जात आहे. मुंबईची लूट करण्याचा प्रयत्न सरकारचा आहे. नवी मुंबईतील लोकांचं सुख चोरण्याचा प्रयत्न केला जातोय. या कामासाठी नगरविकास मंत्र्यांचा आशिर्वाद आहे. भ्रष्टाचार होत आहे."

भाजपा (BJP) कडून याला विरोध होत असून आज नवी मुंबईत (Navi Mumbai) जनजागृती लॉंग मार्च काढण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com