एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी सरकारकडून 350 कोटी रुपये; पगार 24 तासात होण्याची शक्यता
Admin

एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी सरकारकडून 350 कोटी रुपये; पगार 24 तासात होण्याची शक्यता

एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी सरकारकडून 350 कोटी रुपये देण्यात आले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी सरकारकडून 350 कोटी रुपये देण्यात आले आहेत. एसटीच्या रखडलेल्या पगारासाठी मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्याकडे दुपारी चार वाजता मंत्रालयात बैठक होणार आहे. बैठकीला परिवहन विभागाच्या आयुक्त एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आणि सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

एसटी आंदोलनावेळी दर महिन्याला 7 ते 10 तारखेमध्ये पगार करण्याचे आश्वासन सरकारने कोर्टात दिले होते. मात्र दर महिन्यात पगाराला उशीर होत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. दर महिन्याला कर्मचाऱ्यांना पगारासाठी 360 कोटी रुपये मिळायला हवेत. मात्र प्रत्यक्षात तेवढी रक्कम दरमहा मिळत नसल्याने महामंडळाकडून अर्थ विभागाला एक पत्र लिहित थकित रक्कम मागितली होती.

तारीख उलटून गेल्यानंतरही पगार न झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण पसरलं होतं. एसटी कर्मचाऱ्यांचा रखडलेला पगार 24 तासात होण्याची शक्यता आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी सरकारकडून 350 कोटी रुपये देण्यात आले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com