Gotmar Yatra: मध्यप्रदेशातील पांढुर्णा येथील पारंपरिक गोटमार यात्रेत 300 जखमी

Gotmar Yatra: मध्यप्रदेशातील पांढुर्णा येथील पारंपरिक गोटमार यात्रेत 300 जखमी

मध्यप्रदेशच्या पांढुर्णा गावात पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी गोटमार करण्याची परंपरा आहे. पांढुर्णा आणि सावरगावतील ग्रामस्थ एकमेकांवर गोट्यांचा मारा करतात.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

मध्यप्रदेशच्या पांढुर्णा गावात पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी गोटमार करण्याची परंपरा आहे. पांढुर्णा आणि सावरगावतील ग्रामस्थ एकमेकांवर गोट्यांचा मारा करतात. गोटमारीच्या खेळात सकाळपासून आतापर्यंत जवळपास दोन्ही गावातील 300 ग्रामस्थ जखमी झाल्याची माहिती तर 8 ग्रामस्थ गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

गोटमारीच्या खेळात जखमी झालेल्या नागरिकांना रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शेकडो वर्षांपासून या गोटमार खेळाचा अनोखी परंपरा आहे. नदी पात्रातील झेंडा उचलण्यासाठी ही स्पर्धा असते. या स्पर्धेत पांढुर्णा गावातील लोकांनी झेंडा उचलला आहे. एका प्रेमी युगुलाला विरोध म्हणून जाम नदीच्या दोन्ही काठांवर असलेल्या गावकर्‍यांमध्ये दगडफेक झाली.

त्याचं स्मरण म्हणून ही धोंडाफेक केली जाते, अशी एक आख्यायिका सांगितली जाते. तर जुन्या काळात पेंढारी लोकांना शह देण्याकरिता गावकर्‍यांनी केलेल्या गोटमाराची आठवण यानिमित्ताने जागवली जात असल्याचंही सांगितलं जातं.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com