लंडनमधून भारतात येणारं विमान अचानक रद्द; 300 भारतीय अडकले
लंडन विमानतळावर जवळपास 300 भारतीय अडकले आहेत. भारतामध्ये येणारे इंडियन एअरलाईन्सचे विमान लंडन सरकारने अचानक काहीही सूचना न देता रद्द केल्याने भारतीयांची लंडन विमानतळावर गैरसोय होत आहे. शिवाय त्यांना सुरुवातीला या संदर्भात कुठल्याही प्रकारची माहिती फोन द्वारे मेल द्वारे व इतर माध्यमांतून देण्यात आली नाही. आज सगळे प्रवासी भारताकडे निघण्यासाठी विमानतळा आले असता अचानक विमान रद्द करण्यात आल्याचं सांगण्यात आलं. धक्कादायक म्हणजे प्रवाशांची कुठल्याही प्रकारची व्यवस्था त्याठिकाणी केलीली नाही. काँग्रेस प्रवक्ते मिलिंद चिमोटे यांनी ही माहिती दिली आहे.
लंडनमध्ये अडकलेले हे सर्व भारतीय आपल्या वैयक्तिक कामानिमित्त लंडनला गेले होते आणि आता परत येत असताना यांना समस्या निर्माण होत आहेत. यापैकी अनेकांनी त्यांची आर्थिक परिस्थिती गंभीर असून काहींनी हॉटेलमधून चेक आऊट केलं आहे. त्यामुळे अनेकांची गैरसोय होत आहे. अमरावतीचे काँग्रेसचे प्रवक्ता मिलिंद चिमोटे हे सुद्धा सध्या विमानतळावर अडकले असून त्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं सांगितलं. विमानतळ संचालक यासंदर्भात बोलण्यास तयार नसून, याबद्दल सगळ्या भारतीयांनी त्यांना घेराव सुद्धा घातला असल्याचं समजतंय.