ताज्या बातम्या
लातूर ते मुंबई रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर; मुंबई-लातूर, मुंबई-बीदर रेल्वेमध्ये 3 कोचेस वाढले
लातूर ते मुंबई प्रवाशांसाठी खुशखबर! मुंबई-लातूर व मुंबई-बीदर रेल्वेमध्ये 3 नवीन वातानुकूलित कोचेस वाढले. प्रवाशांना आता अधिक आरामदायी प्रवासाची सुविधा उपलब्ध.
लातूर शहर आणि परिसरातून पुणे, मुंबई जाणाऱ्या आणि परतणाऱ्या प्रवासांची मोठी संख्या आहे. या प्रवाशांना मुंबई-लातूर, मुंबई-बीदर रेल्वेमुळे मोठा दिलासा मिळत आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांचा प्रतिसाद आणि मागणी पाहता या रेल्वेगाडीला दोन वातानुकूलित थ्री टायर आणि एक वातानुकूलित टू टायर असे तीन कोचेस वाढवण्याचा निर्णय दक्षिण मध्यरेल्वे प्रशासनाने घेतला आहे. टु टायरच्या 48 आणि थ्री टायरच्या 128 अशा एकूण 176 सीट डिसेंबरपासून वाढणार आहेत. त्यामुळे लातूर शहरासह परिसरातील प्रवासी समाधान व्यक्त करत आहेत.