पंतप्रधान मोदींच्या इस्त्रो मुख्यालयातून 3 मोठ्या घोषणा

पंतप्रधान मोदींच्या इस्त्रो मुख्यालयातून 3 मोठ्या घोषणा

चांद्रयान-3 मोहिमेच्या यशाचं जगभर कौतुक केलं जात आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

चांद्रयान-3 मोहिमेच्या यशाचं जगभर कौतुक केलं जात आहे. 23 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांना फोन करून त्यांचे अभिनंदन केले पंतप्रधान मोदी आज (26 ऑगस्ट रोजी) बेंगळुरुमध्ये दाखल झाले. मोहिमेत सहभागी असलेल्या इस्रोच्या टीमच्या सर्व शास्त्रज्ञांची त्यांनी भेट घेतली.

यावेळी पंतप्रधान मोदींनी सर्वांशी संवाद साधला. मोदी म्हणाले की, देशातली शास्त्रज्ञांनी अशक्य ते शक्य केलं. तुमचं कितीही कौतुक केलं तरी ते कमी आहे. इस्त्रोमुळे आज भारताचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे. आजच्या भारतानं इतिहास घडवला. मोदींनी बोलताना इस्त्रो मुख्यालयातून घोषणा केल्या आहेत की, लॅँडर ज्या ठिकाणी उतरलं त्या ठिकाणाला आता शिवशक्ती असं नाव. तसेच चांद्रयान 2 उतरलेल्या जागेला तिरंगा असं नाव आणि 23 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून साजरा करणार अशा 3 मोठ्या घोषणा मोदींनी केल्या.

कोणताही मुलगा रात्री चंद्राला पाहिल तेव्हा त्याला वाटेल माझा देश ज्या हिंमतीने पोहोचला, तीच हिंमत त्या मुलामध्ये निर्माण होईल. तुम्ही भारतीय मुलांमध्ये अपेक्षांचं बीज रोवलं आहे. भारत विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर ग्लोबल लीडर बनेल. आज भारत चंद्रावर आहे आणि चंद्रावर भारताचा राष्ट्रीय गौरव आहे. असे मोदी म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com