गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्प खर्चात 250 कोटींची वाढ
गोरेगाव- मुलुंड जोडरस्ता प्रकल्पांतर्गत गोरेगाव येथील चित्रनगरी ते पूर्व उपनगरांतील मुलुंड येथील खिंडीपाड्यापर्यंत जुळा व भूमिगत बोगदा बांधण्यात येणार आहे. त्यामुळे या बोगद्याचा खर्च 250 कोटी रुपयांनी वाढणार आहे. सांताक्रूझ-चेंबूर, अंधेरी-घाटकोपर, जोगेश्वरी-विक्रोळी हे मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारे तीन जोडरस्ते आहेत.
मात्र दोन्ही उपनगरांमधील वाढती लोकसंख्या, वाहनांची वर्दळ यामुळे या रस्त्यांची क्षमता संपुष्टात आली आहे. त्यामुळे महानगरपालिकेने चौथा पर्यायी रस्ता तयार करण्याच्या उद्देशाने गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्याचे काम हाती घेतले. अत्यंत गुंतागुंतीचा हा प्रकल्प चार टप्प्यांत होईल. त्यापैकी तिसऱ्या टप्प्यांतर्गत जुळा व भूमिगत बोगदा बांधण्यात येणार आहे.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळ हा संपूर्ण बोगदा असल्यामुळे यात स्फोटके वापरता येणार नाहीत. अत्याधुनिक टनेल बोअरिंग यंत्राच्या (टीबीएम) माध्यमातून तो खणला जाणार आहे. त्यासाठी हळबेपाडा येथे 600 मीटर दूरवर खड्डा खणावा लागणार आहे. दोन्ही उपनगरांमधील वाढती लोकसंख्या, वाहनांची वर्दळ यामुळे या रस्त्यांची क्षमता संपुष्टात आली आहे.