शिंदे गटाचे 22 आमदार, 9 खासदार पुन्हा उद्धव ठाकरेंकडे येणार; ठाकरे गटाच्या 'या' नेत्याने केला दावा

शिंदे गटाचे 22 आमदार, 9 खासदार पुन्हा उद्धव ठाकरेंकडे येणार; ठाकरे गटाच्या 'या' नेत्याने केला दावा

विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर आरोप - प्रत्यारोप करत असतात.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर आरोप - प्रत्यारोप करत असतात. यातच आता ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी एका माध्यमांशी बोलताना एक वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता चांगल्याच चर्चा रंगल्या आहेत.

विनायक राऊत म्हणाले की, शिंदे गटामध्ये गेलेले बऱ्याच आमदारांमध्ये असंतोष खूप मोठ्या प्रमाणात आहे. अनेक आमदार आहेत की ज्यांचा भ्रमनिरास झाला आहे. चार- पाच मंत्री सोडले तर बाकीच्यांना सर्वांच्या तोंडाला पानं पुसली जात आहेत. असे ते म्हणाले.

यासोबतच ते म्हणाले की, आम्हाला फसवलेलं आहे आणि आपल्याला परतीचा मार्ग स्वीकारावा लागत आहे. अशा भावना बऱ्याच जणांमध्ये आहेत.शिंदे गटातील 22 आमदार आणि 9 खासदार संपर्कात असल्याचं विनायक राऊत म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com