मंकीपॉक्स व्हायरसच्या पार्श्वभूमीवर बेंगळुरू विमानतळ हाय अलर्टवरः विमानप्रवाश्यांसाठी चाचण्या आणि 21 दिवसांचे विलगीकरण
बेंगळुरूमधील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाने आफ्रिकन देशांतील प्रवाशांवर लक्ष केंद्रित करत आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी मंकीपॉक्स चाचणी कक्ष स्थापन केला आहे. मंकीपॉक्सची लक्षणे आढळणाऱ्या प्रवाशांना 21 दिवस क्वांरटाईन राहावे लागणार आहे. काही दिवसांपूर्वी हरियाणामध्ये आढळलेल्या मंकीपॉक्स रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याचे समोर आले आहे. WHO ने 14 ऑगस्ट रोजी मंकीपॉक्सला 'सार्वजनिक आरोग्य आणीबाणी' म्हणून घोषित केले आहे.
बेंगळुरूमधील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंकीपॉक्स चाचणी कक्ष उभारण्यात आला आहेत. आंतरराष्ट्रीय प्रवासी, विशेषतः आफ्रिकन देशांमधून येणाऱ्या प्रवाशांची मंकीपॉक्स विषाणू तपासणी करण्यात येणार आणि जर प्रवाशांची चाचणी पॉझिटीव्ह आढळली तर त्यांना 21 दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात येणार आहे. हे नियम कोविड पॅनडॅमिक दरम्यान लागू केलेल्या नियमांसारखेच आहेत. "मंकीपॉक्स चाचणी कक्ष संपूर्णपणे तयार आहे आणि जागतिक मंकीपॉक्सच्या अनुषंगाने जारी करण्यात आलेल्या सर्व आरोग्य आणि सुरक्षा नियमांचे पालन करण्यात येणार असल्याचे केम्पेगौडा विमानतळ प्राधिकरणाकडून सांगण्यात आले.