भाजपाच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; बावनकुळे यांनी सांगितले कुणाला किती जागा
भाजपाच्या प्रसिद्धी प्रमुखांची काल बैठक पार पडली. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी जागा वाटपाचा फॉर्म्युलाच सांगितला. भाजप आणि शिंदे गट एकत्र मिळून ही निवडणूक लढणार आहे. आपण 240 जागांवर लढणार आहोत. शिंदे गटाचे 50च्यावर आमदार नाहीत. 2024च्या विधानसभा निवडणुकीत आपल्या 170 जागा निवडून येतील. असे त्यांनी सांगितले.
तसेच जिल्ह्यात जाऊन कामाचा आढावा घ्यावा लागणार आहे.डिसेंबरनंतरचे पुढचे सहा महिने तुम्हाला रात्र रात्र जागून काम करावे लागेल. त्याची मानसिक तयारी आतापासूनच करा. निवडणुकीत विजयी होण्यासाठी आपल्याला सर्वांनाच मेहनत करावी लागणार आहे. असे त्यांनी सांगितले.
यासोबतच महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागा आहेत. अशात २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा २४० जागा लढवणार तर ४८ जागा या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला दिल्या जाणार आहेत. २०२४ मध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपा एकत्र लढणार आहेत. त्यासाठीचा हा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे.