Ramraje Nimbalkar|Phaltan
Ramraje Nimbalkar|Phaltanteam lokshahi

रामराजे निंबाळकरांचा अजब फतवा, तिकीटासाठी टाकली अट

फलटण तालुक्यातील जावली गावात 15 लाख झाडं लावण्याचा संकल्प
Published by :
Shubham Tate
Published on

जागतीक पर्यावरण दिना निमीत्त फलटण मध्ये 1000 झाडं लावून पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. या उपक्रमाचा शुभारंभ विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Nimbalkar) यांच्या हस्ते वृक्षारोपण करुन करण्यात आला. या कार्यक्रमात सातारा विनविभाग, मुधोजी महाविद्यालय फलटण (Phaltan) तसेच आम्ही निसर्ग सोबती या संस्थांनी सहभाग घेतला. (election ticket plant 10 trees Ramraje Nimbalkars new order in Phaltan)

Ramraje Nimbalkar|Phaltan
कोरोना झाल्यानंतरही देवेंद्र फडणवीस राज्यसभेत मतदान करणार?

यावेळी निसर्गासाठी मोलाचा हातभार लावून लावलेली झाडे जगवण्यासाठी कायम प्रयत्न करण्याचा निश्चय करुन फलटण तालुक्यातील जावली गावात 15 लाख झाडं लावण्याचा संकल्प देखील करण्यात आला. या कार्यक्रमावेळी बोलताना रामराजे यांनी पर्यावरण आणि झाडांच महत्व सांगितलं. प्रत्येक व्यक्तिने 14 झाडं लावली पाहिजेत असा संदेश देत निवडणुकीचं तिकीट पाहिजे तर 10 झाडं लावून दाखवा असा फतवाच काढला पाहिजे. अस मत देखील रामराजे यांनी मांडले. या कार्यक्रमास जिल्हापरिषदेचे अध्यक्ष संजीवराजे निंबाळकर, आमदार दिपक चव्हाण, उपवनसंरक्षक महादेव मोहीते तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com