Sonia and Rahul Gandhi
Sonia and Rahul GandhiTeam Lokshahi

ED Notice : राहुलने वेळ मागितली, सोनिया चौकशीला जाणार

...यामुळे राहुल यांना हवा वेळ
Published by :
Team Lokshahi
Published on

नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी (National Herald) सक्तवसुली संचलनालयानं (ED) काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना समन्स बजावलं आहे. राहुल गांधी यांना 2 जून रोजी तर सोनिया गांधींना 8 जून रोजी चौकशीला बोलवले आहे. आता सोनिया गांधी चौकशीला जाणार असून राहुल यांनी वेळ मागितल्याचे वृत्त आहे.

Sonia and Rahul Gandhi
ED पोहचली काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्यांपर्यंत : काय आहे प्रकरण?, कधी सुरु झाले?

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना समन्स बजावले आहे. ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणात (कलम 50 कायद्यांतर्गत) राहुल गांधींना 2 जूनला आणि सोनिया गांधी यांना 8 जूनला चौकशीसाठी बोलावले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल यांनी आता बाहेर असल्याने त्यांनी वेळ मागितली आहे, तर सोनिया 8 जून रोजी चौकशीसाठी जाणार आहेत.

EDने दोन्ही नेत्यांना नॅशनल हेराल्ड प्रकरणाच्या तपासात सहभागी होण्यास सांगितले आहे. या प्रकरणी ईडीने 12 एप्रिल रोजी काँग्रेसचे दोन मोठे नेते पवन बन्सल आणि मल्लिकार्जुन खर्गे यांचा तपासात समावेश केला होता. 2014 मध्ये सुब्रमण्यम स्वामी यांनी सोनिया आणि राहुल यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. यामध्ये स्वामींनी गांधी परिवारावर ५५ कोटींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप केला होता.

Sonia and Rahul Gandhi
MPSC Result : टेम्पो चालकाचा मुलगा आला राज्यात पहिला, पाहा MPSC निकाल

काँग्रेसचा प्रतिहल्ला

नोटीसच्या मुद्द्यावरून काँग्रेसने केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले की, हुकूमशाही सरकार घाबरले आहे, त्यामुळे बदला घेतला जात आहे. ते म्हणाले की, सरकार सूडाच्या भावनेने आंधळे झाले आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीने सोनिया आणि राहुल यांना समन्स पाठवले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com