Raj Thackeray : राज ठाकरे उद्या रुग्णालयात दाखल होणार, शस्त्रक्रिया होणार
मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यांवर 1 जून रोजी शस्त्रक्रिया होणार आहे. या शस्त्रक्रियेसाठी 31 मे रोजीच ते संध्याकाळी लीलावती रुग्णालयात दाखल होणार आहेत.
राज ठाकरे यांनी पुण्यातील सभेत अयोध्या (ayodhya) दौरा रद्द केल्याचे कारण सांगितले. हा दौरा रद्द करण्यामागे पायाचे दुखणे हे कारण होते. राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यास भाजप खासदार बृजभूषण यांनी विरोध केला होता.
कशाची शस्त्रक्रिया होणार
राज ठाकरे यांनीच पुण्यातील सभेत नेमकी कोणती शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे, याबाबत खुलासा केला. राज ठाकरे यांच्या पायाच्या दुखण्याचा त्रास सुरू वाढला होता. त्यासाठी त्यांनी मुंबईत काही वैद्यकीय चाचण्या केल्या. त्यानंतर हिप बोनची (Hip bone) शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. यामुळे एक जूनला ही शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
काय म्हणाले राज ठाकरे
मी बॅडमिंटन, क्रिकेट, टेनिस खेळणारा व्यक्ती आहे. पण सध्या मला कोणताही व्यायाम करता येत नाही. तसेच कुठलाही खेळ खेळता येत नाही. त्यामुळे मी या सर्व गोष्टींना विटलो आणि ठरवले एकदाचं ऑपरेशन करून टाकू या. अर्थात त्यानंतर मला फार धावता येईल, असंही नाहीये. पण त्यानंतर सगळं सुरळीत होईल, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.