Yasin Malik : दहशतवादी यासीन मलिकला फाशी ऐवजी जन्मठेपच

Yasin Malik : दहशतवादी यासीन मलिकला फाशी ऐवजी जन्मठेपच

कोर्टाने टेरर फंडिंग प्रकरणात दोषी ठरवले...
Published by :
Team Lokshahi
Published on

जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंट या प्रतिबंधित संघटनेचा प्रमुख यासीन मलिक (Yasin Malik)याला दिल्लीतील एनआयए न्यायालयाने (NIA Court) जन्मठेपेची शिक्षा दिली. दोन प्रकरणात दोन जन्मठेप दिली आहे. याआधी गुरुवारी कोर्टाने त्याला टेरर फंडिंग प्रकरणात दोषी ठरवले होते. यासीन मलिकने सुनावणीदरम्यान काश्मीरमधील दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याची कबुली दिली होती. दरम्यान, या शिक्षेविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे एनआयएच्या वकिलांनी सांगितले.

Yasin Malik : दहशतवादी यासीन मलिकला फाशी ऐवजी जन्मठेपच
मोदी सरकारची कामगिरी आहे कशी? आपले मत नोंदवा

दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने यासीन मलिकच्या शिक्षेच्या कालावधीवर आज सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान एनआयएने (NIA) यासिन मलिकला फाशी देण्याची मागणी केली आहे.

कोर्टरूममध्ये उपस्थित वकील फरहानने सांगितले की, यासीन मलिकने कोर्टात सांगितले की, मी शिक्षेवर काहीही बोलणार नाही. न्यायालयाने हवी ती शिक्षा द्यावी. माझ्याकडून शिक्षेबाबत कोणतीही चर्चा होणार नाही. त्याचवेळी एनआयएने यासीन मलिकला फाशी देण्याची मागणी केली. यानंतर यासिन मलिक 10 मिनिटे शांत राहिला. यासीन मलिकने न्यायालयात सांगितले की, मला सांगितले तेव्हा मी आत्मसमर्पण केले, बाकी कोर्टाला जे योग्य वाटेल तो निर्णय द्यावा.

यासीन मलिकने 'आझादी'च्या नावाने जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी आणि इतर बेकायदेशीर कारवाया करण्यासाठी निधी गोळा करण्यासाठी जगभरात नेटवर्क तयार केले होते. याप्रकरणी एनआयएने स्वत:हून दखल घेत 30 मे 2017 रोजी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी 18 जानेवारी 2018 रोजी डझनहून अधिक जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.

लष्कर-ए-तैयबा, हिजबुल मुजाहिदीन, जेकेएलएफ, जैश-ए-मोहम्मद यांसारख्या दहशतवादी संघटनांनी पाकिस्तानच्या आयएसआयच्या पाठिंब्यावर मोठ्या प्रमाणावर नागरिक आणि सुरक्षा दलांवर हल्ले करतात, असे राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) न्यायालयात सांगितले होते.

Yasin Malik : दहशतवादी यासीन मलिकला फाशी ऐवजी जन्मठेपच
Video : मंत्र्याने 1 टक्का कमिशन घेतले, मुख्यमंत्र्यांनी त्वरित बरखास्त करत केली अटक

यासीन मलिकने गुन्ह्याची कबुली दिली

कलम 16 (दहशतवादी कारवाया), कलम 17 (दहशतवादी कारवायांसाठी निधी उभारणे), कलम 18 (दहशतवादी कृत्य करण्याचा कट) आणि कलम 20(दहशतवादी गट किंवा संघटनेचा सदस्य असणे) यानुसार यासीन मलिकला दोषी ठरवले आहे. तो UAPA आणि भारतीय दंड संहितेच्या कलम 120-B (गुन्हेगारी कट) आणि 124-A (देशद्रोह) अंतर्गत त्याच्यावरील आरोपांना आव्हान देऊ इच्छित नाही.

Yasin Malik : दहशतवादी यासीन मलिकला फाशी ऐवजी जन्मठेपच
यासीन मलिकच्या शिक्षेस इम्रान खानचा विरोध

यासीन मलिकच्या घराबाहेर सुरक्षा

दरम्यान, यासीन मलिकच्या काश्मीरमधील घराबाहेर मोठी सुरक्षा ठेवण्यात आली आहे. तसेच काश्मिरमध्येही कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून सुरक्षा दल मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com