Hardik patel
Hardik patel Team Lokshahi

Hardik Patel : गुजरातमध्ये काँग्रेसला मोठा धक्का; हार्दिक पटेल यांची पक्षाला सोडचिठ्ठी

"मी आज धाडस करून काँग्रेसच्या सर्व पदांचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे," अशी माहिती हार्दिक पटेल यांनी ट्विटरवरून दिली.
Published by :
Shweta Chavan-Zagade
Published on

गुजरात निवडणुकीच्या तोंडावर गुजरातमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे गुजरातमधील युवा नेते हार्दिक पटेल (Hardik Patel) यांनी अखेर पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. गुजरातमध्ये या वर्षीच्या अखेरीस विधानसभा निवडणूक होणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून हार्दिक पटेल नाराज असल्याचे बोलले जात होते. ते भाजपात (bjp) जाणार अशीही चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर हार्दिक पटेल यांनी आज (18 मे) काँग्रेसचा राजीनामा दिल्याची माहिती हार्दिक पटेल यांनी ट्विटरवरून दिली आहे.

Hardik patel
Ketaki Chitale : केतकी चितळेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

मी आज धाडस करून काँग्रेसच्या सर्व पदांचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे, अशी माहिती हार्दिक पटेल यांनी ट्विटरवरून दिली आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

राज्य पातळीवरील नेत्यांकडून माझं खच्चीकरण केलं जात असल्याचा आरोप हार्दिक यांनी केला होता. अशातच काही वेळापूर्वी ट्वीट करत त्यांनी आपण काँग्रेसमधून बाहेर पडत असल्याचं सांगितलं आहे. 'माझ्या या निर्णयाचं स्वागत माझे सर्व साथीदार आणि गुजरातमधील जनता करेल, असा मला विश्वास आहे,' असं हार्दिक पटेल यांनी म्हटलं आहे. या निर्णयानंतर मी भविष्यात खऱ्या अर्थाने गुजरातसाठी सकारात्मक काम करू शकेन, असंही त्यांनी म्हटलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com